अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरूये. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.. सततच्या कोसळधारांमुळे शेतात पाणी साचले असून सोयाबीन, कपाशी, तूर अशा पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. नागपूर हवामान विभागाने 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या दीड तासापासून अकोला शहरातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांना वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागत आहे.