चंद्रपूर जिल्ह्यात मागील ४ तासापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. चंद्रपूर शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे.. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालीये.. आता पर्यंत ११६ टक्के पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस जिवती व बल्लारपूर तालुक्यात कोसळलाय..