Global Report | संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेत्यानाहूंवर बहिष्कार, दबाव वाढला तरी युद्धावर ठाम?

हमास इस्रायल युद्ध लांबलंय. तीन वर्ष सुरु असलेल्या या युद्धात हमासचा नायनाट करताना इस्रायल वापरत असलेल्या युद्धनीतीमुळे सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे इस्रायलवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून जोरदार टीका होतेय. अगदी इस्रायलची मित्र राष्ट्रही इस्रायलवर नाराज आहेत. अलिकडेच ब्रिटन, फ्रान्स यांच्यासह अनेक महत्त्वाच्या देशांनी द्विराष्ट्रीय धोरणाचा पुरस्कार करत पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या वर्धापनदिना निमित्त झालेल्य महासभेतच फ्रान्सनं पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं. इतकंच नाही तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे जेव्हा संयुक्त महासभेत बोलण्यास उभे राहिले तेव्हाही इस्रायलविरोधातला रोष प्रखरपणे समोर आला. नेमके काय झालं. या विरोधानंतर तरी नेतान्याहू बधले का, त्यांनी कोणती भूमिका जाहीर केली. त्यांच्या त्या भूमिकेमुळे युद्ध थांबणार की भडकणार पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ