पाकिस्तान हा भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी हे अनेकदा सिद्ध झालंय. अलिकडेच पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादाचं कंबरडं मोडलं. मात्र हा आपल्यावरच हल्ला झाल्याची ओरड पाकिस्तान कायम करत आलाय. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी सभ्यतेच्या बुरख्याआड भारताविरोधात गरळ ओकली... त्यासाठी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मखलाशीही केली. मात्र त्यांचा हा बुरखा फाडायला भारताच्या युवा राजनैतिक अधिकारी पेटल गेहलोत पुरून उरल्या.. काय नेमकं घडलं महासभे.. पाकिस्तानचा काय डाव होता. भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी तो कसा हाणून पाडला पाहूया एक रिपोर्ट....