परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीय.गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड पालम तसेच गंगाखेड राणी सावरगाव रस्ता बंद झालेला आहे. गंगाखेड, पूर्णा, पालम या तीनही तालुक्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. पूर्णा ते नांदेड रोडवर मौजे चुडावा गावाजवळ पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद केलेली आहे.