मुंबई सह कोकणात उद्या मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.उद्या हा पाऊस दिवसभर असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून दुपारी 2:45 वाजता हाय टाईड आहे. पहिली हाय टाईड ही सकाळी 3:18 वाजता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे