नाशिक जिल्ह्यात उद्या ढगफुटीसदृश पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय...उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता, स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलीय.