अमरावतीत यंदाही उन्हाळ्यात पाणीटंचाईचं सावट दिसून येतंय.707 गावांवर पाणीटंचाईचं संकट आहे.पाण्यासाठी तब्बल 17 कोटी 37 लाखांचा आराखडा तयार आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरीही मिळाली.या आराखड्यात 483 खासगी विहिरीचे अधिकरण प्रस्तावित आहे. त्यामुळे पाणी टंचाईची कामे करण्याचा मार्ग आता मोकळा झाला..