मे महिन्यात सलग चार दिवस बारामतीत मुसळधार पाऊस पडतोय.बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातील नागरिकांच्या घरात थेट या पावसाचे पाणी शिरलं आहे.यामध्ये नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचेही नुकसान झालं आहे. धान्य भिजले असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.