बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत.. अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. गावातीलच मंदिरात दर्शनासाठी जात असताना संदिपान अडसूळ यांच्या अंगावर चिरेबंदी वाड्याची भिंत कोसळली.. या दुर्घटनेत अडसूळ गंभीर जखमी झालेत... स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं...त्यांना तातडीने धानोरा येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..