Beed| तालखेड फाट्यावर डिझेलच्या टँकरचा अपघात; सांडलेलं इंधन गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ डिझेलने भरलेला टँकर अचानक उलटून अपघात झालाय.या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडलं.. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील नागरिकांनी बादल्या, कॅन आणि भांडी घेऊन घटनास्थळी धाव घेत सांडलेले डिझेल गोळा करण्यासाठी झुंबड उडवली. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. माहिती मिळताच पोलिस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित व्हिडीओ