Ashok Kharat प्रकरणी SIT कडून साडेपाच तास चौकशी झाल्यानंतर Rupali Chakankar यांची पहिली प्रतिक्रिया

अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर अखेर SIT समोर हजर झाल्या. रुपाली चाकणकर यांची जवळपास पाच तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच चर्चेत होते. खरातला गुरू मानणाऱ्या चाकणकर शिवनिका संस्थानच्या विश्वस्त मंडळातही होत्या. त्यामुळे महिलांवरील अत्याचार आणि शिवनिका संस्थानचे घोटाळे यांमध्ये रुपाली चाकणकर सहभागी असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. अखेर दोन महिन्यांनंतर विशेष पोलीस पथकाने रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी पाचारण केलंय. आज एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीत चाकणकरांची चौकशी झाली. तब्बल साडे पाच सातानंतर त्यांना सोडण्यात आलंय..

संबंधित व्हिडीओ