वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाखाली सुरू असलेल्या लोअर हाइट सबवेच्या रखडलेल्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरकंडी, मोहगव्हाण, देवाळा, उकळी पेन आणि फाळेगाव या गावांचा मुख्य संपर्क मार्ग बंद झाल्याने वाहनधारकांना पर्यायी एक ते दीड किलोमीटर लांबचा मार्ग वापरावा लागत आहे. विशेषतः वाहनधारक शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना याचा मोठा फटका बसत आहे.या परिस्थितीचा आढावा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.