बीडच्या आष्टीत हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दोन दिवसांपासून आष्टीत मुसळधार पाऊस सुरू आहे. पूरग्रस्त गावांमधून शेकडो नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. बीडच्या मुसळधार पावसामुळे घरं, शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.