जालन्यात आज बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. मम्मा देवी चौकातून निघालेल्या या मोर्चात बंजारा वेशभूषेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. जोपर्यंत एसटी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.