छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. कातपूर गावात नदीचे पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. विकास गाडे यांच्या ड्रोनमधून हे नुकसान समोर आले होते, आणि आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.