बीड आणि जालन्यात बंजारा समाजाचा भव्य जनआक्रोश मोर्चा सुरू आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जालन्यातील मम्मा देवी चौकातून निघालेल्या मोर्चात बंजारा वेशभूषेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, हिंगोलीत मात्र बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आदिवासी समाजाने मोर्चा काढला आहे.