छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे. आमठाणा आणि धावडा या गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून, देऊळगाव बाजार गावात पाणी शिरले आहे. आमठाणासह आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांमध्येही पाणी घुसले असून, पुलांवरूनही पाण्याचा प्रवाह सुरू आहे. या पुरामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.