दुपारी १२ वाजताच्या चार मोठ्या बातम्या: पहिली बातमी मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे मराठवाड्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. तिसरी बातमी नाशिकमधील, जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवार गटाने ट्रॅक्टर मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली आहे. चौथी बातमी मनोरमा खेडकर यांच्या संदर्भात, ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे.