दिवाळीचा सण... घराघरांत गोडधोड, रोषणाई आणि आनंदाचं वातावरण... मात्र बीडच्या आष्टी तालुक्यातील सय्यद मेह लोणी गावात राहणाऱ्या नवनाथ साळुंखे कुटुंबाच्या नशिबी मात्र आजही चटणी-भाकरच आहे. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी लागणारे साहित्य बनवून गावोगावी फिरत कष्टाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या या कुटुंबाचा आधार असलेल्या घोड्याचा मृत्यू झालाय. घरात तीन चिमुकली मुलं... त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांची धडपड सुरू आहे. संसाराचा गाडा चालवण्यासाठी फक्त एक घोडा देण्याची मागणी करण्यात येतेय. .