महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेळोवेळी उधाण येत असतं. अशातच धाराशिवचे शिंदेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एका वक्तव्याने या चर्चेला अजूनच बळ मिळालंय. 'दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, तर माझ्यापेक्षा जास्त आनंदी माणूस दुसरा कोणीही नसेल', असं वक्तव्य खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलंय. ओमराजेंच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. मात्र त्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठांचा असेल, असंही ओमराजे म्हणालेत. दरम्यान दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, याबाबतची चर्चा रंगलेली असताना, त्यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलीय. सध्याची परिस्थिती पाहता तसं काही घडेल, असं वाटत नसल्याचं गोगावले म्हणालेत. मात्र, राजकारणात कधीही काहीही घडू शकते, त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.