नायगाव रेल्वे स्थानकांवर घडलेल्या प्रकारामुळे मुंबईच्या लोकलमध्ये महिला खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय. गोरेगावहून आईला भेटून परतत असताना एका 20 वर्षीय मुलीची एका प्रवाशाने छेड काढली..या प्रकाराला विरोध करत तरूणीने नायगाव स्थानकात उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला जाब विचारला..याच वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली..त्यामुळे संतापलेल्या तरूणीने आरोपीला चप्पल फेकून मारली...त्यानंतर आरोपीनेही तिला चप्पल फेकून मारत जोरात धक्का दिला...त्यामुळे ती तरूणी लोकल आणि फलाटाच्या मधल्या जागेतून थेट रुळांवर पडली. नेमकी त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने तिला स्वतःचा बचाव करता आला नाही. लोकलच्या चाकाखाली तिचा डावा हात आल्याने कोपरापासून हात कापला गेला...आरोपी जितेंद्र हिरमुखे याला पोलिसांनी अटक केली आहे....गंभीर बाब म्हणजे ही संपूर्ण घटना संध्याकाळी गर्दीच्या वेळी घडूनही तरूणीच्या बचावासाठी कुणीच पुढे आलं नाही...त्यामुळे रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय..