मुंबईनंतर आता पुणे महानगरपालिकेलाही बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाला. या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली असून अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक पथक तातडीने महानगरपालिका मुख्यालयात दाखल झाले आहे. परिसराची कसून तपासणी सुरू असून सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.