मुंबईतील बांगूरनगर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २१ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे कोकेन जप्त केले आहे. गोरेगाव पश्चिम येथून एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ४ किलोहून अधिक कोकेन जप्त करण्यात आले असून मुजाहिद अली या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.