Bhandara | आजपासून पुढील 9 दिवस 'नवतपा'; पुढील नऊ दिवस वर्षातील सर्वात उष्ण दिवस ठरणार

आजपासून नवतपाला सुरुवात झाली. 25 मे ते दोन जून या कालावधीमध्ये वर्षातील सर्वाधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे... या काळात सूर्याची प्रखर किरणे थेट जमिनीवर पडून हवामानातील आद्रता कमी होऊन उष्ण लहरी प्रवाहित होणार आहेत... त्यामुळे नागरिकांनी या नवतप्यामध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे... यामध्ये आवश्यक नसताना घराबाहेर निघू नये... सुती कपड्यांचा वापर करावा शीतपेय यांचा वापर करावा पाण्याची प्रमाण वाढवावे... अशाप्रकारे काळजी घेत या नवतपामध्ये नागरिकांनी आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे... पुढील नऊ दिवस हे धोक्याची असून वर्षातील सर्वाधिक तापमान या नऊ दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे... त्यामुळे सर्वांनीच या नवतप्यामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे... तर या उन्हाळयात भंडारा जिल्हातील तापमान सर्वाधिक 45 % सेल्सिअस ची नोंद करण्यात आलीय... या नवतप्यात अधिक तापमान वाढण्याचं अंदाज हवामान विभागाने वर्तविले आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी.

संबंधित व्हिडीओ