Pandharpur| बँकेच्या व्याजदरापेक्षा दाम दुप्पटीचं आश्वासन देत दोन कोटींची फसवणूक; 25 महिलांना फसवलं

बँकेच्या व्याजदरापेक्षा दाम दुप्पट देण्याचं आमिष दाखवत पंढरपुरात 25 महिलांची फसवणूक करण्यात आलीय... पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील 25 ते 30 महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आलीय.. राजेंद्र निराळी आणि मेहबूब दस्तगीर यांनी पैसे घेऊन ही फसवणुक केली आहे. यामध्ये राजेंद्र निराळे यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी गेल्यावर पैसे मागितले तर आत्महत्या करेन.. असा उलट धमक्या महिलांना देण्यात आल्या.. या महिलांनी घरातील सोने विकून तसेच सेव्हिंग केलेले सर्व पैसे दाम दुपटीच्या नावाखाली निराळे यांच्याकडे दिले होते.. यामध्ये काही महिलांना निराळे यांनी कोरा चेक देखील सही करून जामीन म्हणून दिलाय... मात्र आता ही फसवणूक झाल्याची गोष्ट पुढे येत आहे. याबाबत या सर्व महिलांनी पंढरपुरात आज पोलिसात येऊन तक्रार दिली आहे. यामध्ये एकट्या भाळवणी गावात साधारणपणे दोन कोटी रुपये रक्कमेच्या वर अधिकच्या पैशाची फसवणूक झाल्याचे पुढे येत आहे. याबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीही आक्रमक झालीय.

संबंधित व्हिडीओ