सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली.. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न झाला.. सुप्रीम कोर्टात वकिलानं सुनावणीदरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं.. वकिलाने सुनावणी दरम्यान मंचाच्याजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवत कोर्टाबाहेर काढलं.. दरम्यान, आता सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.. सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला म्हणजे लोकशाही आणि संविधानाचा अपमान आहे., सनातनी हिंसक कसे होऊ शकतात? त्यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय.तर हल्लेखोर हा मानसिक संतुलन बिघडलेला असावा अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवईंचे बंधू राजेंद्र गवई यांनी दिली.. तर आंबेडकरी अनुयांनी शांतता राखावी,असं आवाहनही त्यांनी केलं..