कल्याणमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थी एकाच रिक्षातून जीवघेणा आणि धोकादायक प्रवास करताना दिसत आहेत. एकाच रिक्षात १० ते १५ विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक केली जात आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे हे सरळ उल्लंघन असून, या प्रकाराकडे कल्याण वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांचे झालेले मोठे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येते.