किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके यांच्यावर सोशल मीडियातून ट्रोलिंग सुरू आहे.... मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उभे ठेवत त्यांनी भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे... शिवरायांच्या पालखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालखी घेत असताना बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचे दिसते.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.