Pakistan च्या हल्ल्याचा Afghanistan बदला घेणार? दोघांमध्ये संघर्ष का वाढला? तज्ज्ञांचं विश्लेषण

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशातील तणाव वाढलाय.पाकिस्ताननं काल रात्री अफगाणिस्तानमधील टीटीपी आणि आयसिसच्या 8 ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती मिळतेय. टीटीपी दहशतवादी अड्डे नष्ट झाल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय.अफगाणिस्तानच्या नांगरहारमधील खोग्यानी जिल्ह्यात अनेक हल्ले केलेत.यात 17 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झालाय.मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याचा दावा करण्यात येतोय.. पाकिस्तानने एका मदरशाला लक्ष्य केलंय.पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला केला.पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राचं उल्लंघन केल्याचं अफगाणिस्ताननं म्हटलंय.. या हल्ल्यांमुळे तालिबान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय... दरम्यान नागरिकांना निशाण्यावर ठेवून पाकिस्ताननं हल्ला केल्याचं अफगाणिस्ताननं म्हटलंय. पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं अफगाणिस्ताननं म्हटलंय.. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर काबुल और कंधार आपातकालीन बैठक बोलवण्यात आली.

संबंधित व्हिडीओ