जालन्यातील सावखेडा गावात अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास शेतातील मक्काच्या गंजीला आग लावल्याची धक्कादायक घटना घडलीय. या आगीत बाबासाहेब जाधव या शेतकऱ्याची सुमारे 100 क्विंटल मका जळून खाक झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालंय... अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास ही गंजी पेटवून दिलीय.आज सकाळी शेतातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच शेतकरी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत संपूर्ण मका जळून खाक झाला होता.यात शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाल्याने महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलीय..