मुंबईतील बोरिवली परिसरात मोठी दुर्घटना टळली आहे. मेट्रो मॉलसमोर सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पातील स्लॅब अचानक कोसळल्याची घटना काही तासांपूर्वी घडली. स्लॅब खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले असून काही वाहने ढिगाऱ्याखाली अडकली आहेत.