चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही दृश्ये पाहून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकीकडे सरकार आणि प्रशासन 'कॉपीमुक्त' परीक्षेचे दावे करत असताना, दुसरीकडे सर्वोदय कॉलेजने कॉपीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे विद्यार्थी कोणत्याही साध्या परीक्षेला बसलेले नाहीत, तर ते बी.ए. प्रशासकीय सेवा (Civil Services) या विषयाचा पेपर देत आहेत. उद्याचे अधिकारी घडवणाऱ्या या परीक्षेचा पायाच भ्रष्टाचारावर आधारलेला दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय की, विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आहेत आणि ते कोणतीही भीती न बाळगता गुगलवर उत्तरे शोधून पेपर सोडवत आहेत.