Gadchiroli| आरोग्य पथकाने दिलेल्या गोळ्यांमुळे आश्रमशाळेच्या 70 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर इथल्या आश्रम शाळेत 70 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळतीय... वसंतराव नाईक आश्रम शाळेत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 130 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 गोळ्या वाटल्या आणि रोज 1 गोळी खायला सांगितली.. काही विद्यार्थ्यांनी जेवणानंतर पहिली गोळी खाताच जवळपास 70 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली.. त्यांना ताप उलटीचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतीय.. त्यांना चामोर्शी आणि गडचिरोली इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. दरम्यान, आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळतीय.. आश्रम शाळेतील 70 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

संबंधित व्हिडीओ