सध्याचे सरन्यायाधीश हे कर्तव्यदक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी आता लोकशाही वाचवली पाहिजे, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश भूषण गवईंना केलीय.. तीन-चार वर्षांपासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडत आहे, तिला न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केलीय.. मार्मिकच्या 65 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.