Global Report | Pakistanच्या धमक्याचं सत्र आजही सुरु, 48 तासात पाककडून भारताला युद्धाचा इशारा

पाकिस्तानच्या धमक्याचं सत्र आजही सुरु राहिलं. गेल्या 48 तासात पाकिस्तानच्या नेत्यांनी तीन वेळा भारताला युद्धाचा इशारा दिलाय. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जलकरार स्थगित केलाय. त्यामुळे जर सिंधू नदीच्या भारतीय हद्दीतून जाणाऱ्या तीन उपनद्यांचं पाणी भारतानं अडवलं, तर अख्ख्या पाकिस्तानचा घसा कोरडा पडेल अशी भीती पाकिस्तानला वाटतेय. त्यामुळेच पाकिस्तानच्या ज्येष्ठ नेतृत्वाकडून भारताला धमक्या देण्याचा उपद्व्व्याप सुचतोय..पण धमक्या देताना पाकिस्तानचे नेतृत्व इतिहास विसलंय. भारताशी झालेल्या सगळ्या युद्धात पाकिस्तानची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. त्यामुळे पोकळ धमक्यांना भारत अजिबात भीक घालत नाही हेही पाकिस्ताननं लक्षात ठेवलं पाहिजे.

संबंधित व्हिडीओ