15 ऑगस्टपासून वाहनचालकांसाठी टोल भरण्याचा त्रास आता कमी होणार आहे. NHAI खासगी वाहनांसाठी FASTag वार्षिक पास योजना सुरू करत आहे. केवळ तीन हजार रुपयांत वर्षभर निवडक महामार्गांवर टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. या योजनेमुळे वेळ, पैसा आणि टोल प्लाझांवरील गर्दी – तिन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ने सांगितले आहे.