तिकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेली जवळपास अडीच वर्ष सुरु आहे. हे युद्ध थांबेल अशी आशा पुन्हा एकदा निर्माण झालीय., भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्टला रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कामध्ये भेट होणार आहे. या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे. शांतीदूत म्हणून जगात प्रस्थापित करु इच्छिणाऱ्या ट्रम्प यांची प्रतिष्ठा बैठकीत पणाला लागणार आहे