Chh. Sambhajinagar मुक्त विद्यापीठाच्या पेपर तपासणीत घोटाळा, बायोमेट्रिकचा गैरवापर

शिक्षणक्षेत्राला हादरवणारा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे समोर आलाय. अधिकृत परीक्षकांच्या बायोमेट्रिकचा गैरवापर करून अनधिकृत शिक्षकांकडून तब्बल १९ हजार २३१ उत्तरपत्रिका तपासून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यमापन केंद्रावर हा गैरप्रकार घडला. अधिकृत परीक्षक प्रत्यक्ष केंद्रावर गैरहजर असतानाही त्यांच्या अंगठ्याचा वापर करून पेपर तपासणीची लिंक सुरू करण्यात आली. त्यानंतर बनावट आयडीच्या माध्यमातून अनधिकृत व्यक्तींकडून उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. या प्रकरणात तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांच्या मानधनाचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

संबंधित व्हिडीओ