मालाड येथील मालवणी टाऊनशिप शाळेच्या कथित खासगीकरणाविरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. पालिकेने ही शाळा खासगी संस्थेकडे देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या निर्णयामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्ते आणि पालकांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.