शिमला येथील रामपूरजवळील जगातखाना इथे काल ढगफुटी झाली.मुसळधार पावसामुळे रात्री नाल्याला पूर आला. यात मलब्यासह रस्त्याकडेला असलेल्या 15 गाड्या वाहून गेल्या. सतलज नदीच्या प्रवाहात या गाड्या वाहून गेल्या.. रामपूर उपविभागात अनेक ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे सफरचंदाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रामपूरमध्ये मुसळधार पावसामुळे तीन रस्ते बंद झाले होते. रात्री उशिरापर्यंत तिन्ही रस्ते पुन्हा सुरू करण्यात आले होते. हवामान खात्याने जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा दिलाय..