सध्याच्या घडीला राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा अवघ्या 28.10 टक्क्यांवर आला आहे.वीज निर्मितीचे प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा तर फक्त 19.36 टक्क्यांवर आला आहे.त्यामुळे पाऊस लांबला तर वीज निर्मितीचे संकट निर्माण होऊ शकते. राज्याच्या विविध भागात लहान-मध्यम आणि मोठी मिळून सुमारे 2 हजार 997 धरणे आहेत. या सर्व धरणांत शनिवारी 28.10 टक्के पाणीसाठा होता.मागच्या वर्षी याच दिवशी सर्व धरणांमध्ये मिळून 24.79 टक्के पाणीसाठा होता.