अंबरनाथमध्ये हॉटेलच्या सॉसमध्ये चक्क मेलेल्या माश्या आढळल्या आहेत. पाईपलाईन रोडवरील 5 K हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप ग्राहकाने केलाय. ऍड. महेश वाळुंज मुलीच्या वाढदिवसानिमित्त 5के हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी सॉसमध्ये त्यांना मेलेल्या माशा आढलल्या. वाळुंज यांनी संताप व्यक्त करत पोलीस तक्रार करण्याचा इशारा दिला.त्यावेळी तुम्ही कशाला पोलीस ठाण्यात जाता, पोलीसच इथे बसलेत, असं म्हणत हॉटेल कर्मचाऱ्यांनी दमदाटी करायला सुरूवात केली.याप्रकरणी आता एफडीएकडून हॉटेलची तपासणी व्हावी अशी मागणी वाळुंज यांनी केली.