विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या घटनेनंतर आता विरोधक आक्रमक झालेयत.राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे सर्व खासदारांनी गांधी स्मृती भवन येथे गेले.लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी विरोधकांनी हे आंदोलन केलं.यावेळी मोठा तणाव देखील निर्माण झाला होता, राहुल गांधींचे घर ते गांधी स्मृती भवन दरम्यान मार्गावर अमित शाहांचं निवासस्थान असल्याने सुरूवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि अखेर काही वेळाने पोलिसांनी विरोधकांच्या बसेसना जाण्याची परवानगी दिली..