'लेडीज ओन्ली' म्हणून प्रमोट केलेल्या थायलंडच्या टूरमध्ये पुरुषांनाही घुसवणे ट्रॅव्हल कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. मुंबईतील ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ट्रॅव्हल कंपनीला दोषी ठरवत 60,000 रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. चेंबूर येथे राहणाऱ्या महिलेने ही तक्रार केली होती. 15 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत फुकेत आणि क्राबीची टूर नेण्यात आली होती. 4 रात्री आणि 5 दिवसांच्या टूरसाठी या महिलेने 99,500 रुपये भरले होते. ट्रॅव्हल कंपनीने दिलेली अनेक आश्वासने फक्त कागदावरच राहिली होती, प्रत्यक्षात अनेक आश्वासनांना ट्रॅव्हल कंपनीने हरताळ फासल्याचा महिलेने दावा केला होता.