यंदा अल निनोच्या प्रभावामुळे भारतासह महाराष्ट्रावर कोरड्या दुष्काळाचं सावट असेल असा अंदाज वर्तावण्यात आलाय. त्यानुसार पावसाने जून महिन्यात आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी ओढही दिली. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या धुँवाधार पावसाने आणि या आठवड्याच्या सुरूवातीपासून सुरू झालेल्या पावसाने पावसाची आतापर्यंतची सरासरी भरून काढलीय. सध्या राज्यभरातल्या धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाला असून पावसाचा पॅटर्न असाच राहिल्यास पुढच्या वर्षातल्या पाण्याची चिंता मिटणार आहे. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.