गुजरातमधील मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. जळगाव-नंदुरबार मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द किंवा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. गोरखपूर-बांद्रा साप्ताहिक एक्सप्रेस नवापूर येथेच थांबवण्यात आली, तर खानदेश एक्सप्रेस नंदुरबारपर्यंतच धावणार आहे. पटना-बांद्रा सुपरफास्ट एक्सप्रेसही अमळनेर येथे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.