गावाक कसा जाऊचा?.... चाकरमान्यांचा हा प्रश्न याहीवर्षी कायम आहे.... कारण कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकीटं कधीच फुल्ल झालीयत.. बसेसच्या तिकीटांचे दर कायच्या काय वाढलेत... आणि रस्त्यावरुन जायचं म्हटलं तर खड्डे आणि ट्रॅफिकची समस्या कायम आहे... असं असताना पुन्हा एकदा कोकणात विमानानं जाण्याचं स्वप्न कोकणवासियांना दाखवण्यात आलंय.. येत्या १५ ऑगस्टपासून नवी मुंबई – सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळादरम्यान थेट विमान सेवा सुरू होणार आहे... तसं झालं तरी चिपी ते पुढे गावाला कसं जायचं... या प्रश्नाचं उत्तर गेली कित्येक वर्षं मिळालेलंच नाही...