Gujarat| Vapi-भिलाडमध्ये मुसळधार पाऊस; Mumbai-Ahmedabad राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, महामार्ग ठप्प

गुजरातमधील वापी-भिलाड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. भिलाड येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भिलाडपासून महाराष्ट्रातील पालघरच्या धुंदलवाडीपर्यंत आणि तलासरी-दापचेरी मार्गावर तब्बल 35 ते 40 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.कंटेनर, ट्रक आणि इतर वाहनांसह हजारो प्रवासी तीन ते चार तासांपासून अडकले आहेत. प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी...

संबंधित व्हिडीओ