विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आता थेट कार्यकर्त्यांकडून नेतृत्वबदलाची मागणी होत आहे. थेट जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी झाली. वर्षानूवर्ष एकच जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख कार्यकरत असताना पक्ष वाढणार कसा असा प्रश्न कार्यकर्त्यांनी पवारांना विचारला आहे.